साखर कामगार प्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा : पीएमके

चेन्नई : चीनी मंडी

राज्यातील खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले आणि साखर कामागारांचे वेतन थकवले आहे. याप्रकरणी राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पीएमके पक्षाचे संस्थापक एस. रामदोस यांनी केली आहे.

या प्रकरणी त्यांनी दिलेल्या निवेदनात आरोप केला आहे की, अरोरान शुगर्स आणि अंबिका शुगर्स या कारखान्यांनी कामगारांचे वेतन थकवले आहे. जवळपास ५०० कामगारांना गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

राज्याचे कृषी मंत्री दोराईकन्नू यांच्याच मतदारसंघात असणाऱ्या कारखान्यांमधील या प्रश्नावर सरकारने अद्याप कोणताही तोडगा काढलेला नाही.

रामदोस म्हणाले, ‘राज्यातील २४ खासगी साखर कारखान्यांचे मिळून शेतकऱ्यांची १ हजार ३०४७ कोटी रुपयांती थकबाकी आहे. पण, सरकारकडून निव्वळ आश्वासनापलिकडे काहीच मिळालेले नाही.’

सरकारने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करावा किंवा हा विषय हताळण्यास आम्ही असमर्थ असल्याचे मान्य करत राजीनामा द्यावा, असे आव्हान रामदोस यांनी दिले आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here