४० कोटींच्या साखरेचा होणार लिलाव, ऊस शेतकऱ्यांच्या थकीत रकमेची भरपाई होईल 

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

हापूड (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

ब्रजनाथपूर साखर कारखान्याच्या १.२४ लाख क्विंटल साखरेचा २२ फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. या कारखान्याकडून शेतकऱ्यांची ४७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. साखरेच्या लिलावातून जवळपास ४० कोटी रुपयांची थकबाकी शेतकऱ्यांना देणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर सिंभावली साखर कारखाना येत्या १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना या हंगामातील सर्व थकीत बिल देणार आहे.

जिल्ह्यात सिंभावली आणि ब्रजनाथपूर साखर कारखान्यांची २०१७-१८ची जवळपास ९४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी देण्यासाठी १५ फेब्रुवारीला ब्रजनाथपूर साखर कारखान्याच्या १.४२ लाख क्विंटल साखरेचा लिलाव होणार होता. पण, केवळ १८ हजार ४३० क्विंटल साखरेचा लिलाव  होऊ शकला. त्यामुळे जिल्हा प्रशासन व ऊस विभागाने २२ फेब्रुवारीला उर्वरीत १.२४ लाख क्विंटल साखरेच्या लिलावाची घोषणा केली आहे.

कारखान्याच्या या साखरेची किंमत जवळपास ४० कोटी रुपये होते. तर, ब्रजनाथपूर साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे गेल्या हंगामातील ४७ कोटीही थकीत आहेत. त्यामुळेच साखरेच्या लिलावानंतर शेतकऱ्यांची देणी भागवण्यात येतील, असा दावा ऊस अधिकारी करत आहेत. त्याचबरोबर सिंभावली साखर काखान्यावर गेल्या हंगामातील ४८ कोटी रुपयांचे थकीत ऊस बिल आहे. येत्या १५ मार्चपर्यंत ही बिले भागवण्यात येतील, असा दावा कारखान्याकडून करण्यात येत आहे. जिल्हा ऊस अधिकारी ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, २२ फेब्रुवारी रोजी ब्रजनाथपूर कारखान्याच्या साखरेचा लिलाव करण्यात येईल आणि त्यातून ऊस उत्पादकांची थकीत बिले भागवण्यात येतील.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp   

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here