सहारनपुर बिभागात 10 हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्रफळ वाढले

127

सहारनपूर : विक्रमी गाळपाबरोबरच कोरोना काळात सहारनपूर विभागामध्ये ऊसाचे क्षेत्रफळ जवळपास 10 हजार हेक्टर पर्यंत वाढले आहे. गेल्या वर्षी विभागामध्ये 3.17 लाख हेक्टर ऊस होता जो आता वाढून सव्वातीन लाख हेक्टर च्या पुढे आहे.

विभागातील 205 गावात झालेल्या ऊस सर्वेमध्ये हा खुलासा झाला आहे. यामुळे विभाग अधिक उत्साहीत दिसत आहे. ऊस उपायुक्त डॉ. दिनेश्‍वर मिश्र म्हणाले, सहारनपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जवळपास 5 टक्क्याची वाढ नोंद केली आहे, तर शामली आणि मुजफ्फरनगर मध्ये जवळपास 2 टक्के पर्यंत क्षेत्रफळ वाढले आहे. एकंदरीत विभागामध्ये जवळपास 3 टक्क्यांची वाढ झाली आहे.

जिल्ह्यामध्ये बजाज गांगनौरी कारखाना क्षेत्रामध्ये जवळपास 3 टक्के, उत्तम शेरमउ कारखान्यात 3.5 टक्के, त्रिवेणी देवबंद मध्ये 5 टक्के, सरसावा अर्धा टक्के, नानौता 2 टक्के, सहारनपूर समिती व बिडवी कारखान्याच्या संयुक्त क्षेत्रफळामध्ये जवळपास 22 टक्के तथा गागलहेडी कारखान्यात 13.5 टक्क्यांची वाढ आहे. तर टोडरपूर क्षेत्रामध्ये 4 टक्के क्षेत्रफळ वाढले आहे. याचप्रमाणे मुजफ्फरनगर मध्ये तितावी, खतौली आणि मंसूरपूर आदी साखर कारखान्यांमध्ये ऊसाच्या रोपांचे क्षेत्रफळ कमी झाली आहे, पण तरीही 1 टक्क्याची वाढ आहे.

तर शामली जिल्ह्यामध्ये एक ते दोन टक्के वाढ नोंदली गेली आहे. ऊस उपायुक्त डॉ. दिनेश्‍वर मिश्र म्हणाले, एकंदरीत विभागामध्ये ऊसाच्या क्षेत्रफळामध्ये 3 टक्के (जवळपास 10 हजार हेक्टर) वाढ नाेंंदली गेली आहे. जी कोरोना काळात निश्‍चितच एक चांगला संकेत आहे.

ऊस क्षेत्राफळामध्ये तीन टक्के झालेल्या वाढीमध्ये ही खास गोष्ट आहे की, विभागामध्ये एकूण ऊस क्षेत्रफळापैकी 90 टक्के ऊस 0238 प्रजातिचा आहे.ऊस उपायुक्त यांच्या मतानुसार, यावर्षी पासून 0238 व्हारायटी ला पर्याय म्हणून अनेक नव्या व्हारायटीजना गती देण्याचा प्रचार केला जात आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here