लखनऊ: पुढील गाळप हंगामासाठी राज्यात ऊस पिकाची लागण सुमारे एक लाख हेक्टरने वाढली आहे. राज्याचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी राज्यात २६.७९ लाख हेक्टरमध्ये ऊसाची लागण झाली होती. यंदा यात वाढ होऊन हे क्षेत्र २७.७५ लाख हेक्टरपर्यंत झाल्याची माहिती राणा यांनी दिली.
गेल्यावर्षी राज्यात २१७२.५३ लाख टन उसाचे उत्पादन झाले होते. यावर्षी लागण वाढल्याने उसाचे उत्पादन आणखी वाढेल. उत्तर प्रदेश सहकारी साखर कारखाना संघाच्या साखर कारखान्यांचे विस्तारीकरण, क्षमता विस्तार केला जाणार आहे. संघाच्या आठ डिस्टिलरी पुढील गाळप हंगामात रसापासून इथेनॉल उत्पादन करतील. या इथेनॉलला चांगला दर मिळेल. जर एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात खासगी डिस्टिलरी असेल तर त्या कारखान्याने रसापासून इथेनॉल तेथून तयार करून घ्यावे. इथेनॉलमध्ये त्याचे रुपांतर करण्यासाठी जो खर्च येईल, तो खासगी डिस्टिलरींना दिला जाईल असे मंत्री राणा म्हणाले. काही खासगी गुंतवणुकदारांनीही साखर कारखाने सुरू करण्यास उत्सुकता दर्शविली असल्याचे त्यांनी सांगितले. या हंगामात सहकारी संघाने साठ टक्के उसाचे पैसे दिल्याचे ते म्हणाले.
संघाच्या २४ सहकारी साखर कारखान्यांनी एकूण ८७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन आतापर्यंत केले आहे. यावेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ लाख लिटर इथेनॉल जादा उत्पादन झाले आहे. एकूण १७६ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले. रमाला साखर कारखान्याने ३१ कोटी आणि सठियांव कारखान्याने ६ कोटी रुपयांच्या विजेची विक्री केली. रमाला साखर कारखान्याने ८३ लाख क्विंटल उसाचे गाळप करून सर्वाधिक गाळपाचा पुरस्कार पटकावला आहे. तर पुवाया कारखान्याला सर्वाधिक रिकव्हरी, सठियाव कारखान्याला तांत्रिक तसेच तिलहर कारखान्याला ऊस विकासाबद्दल पुरस्कार मिळाल्याचे ऊस मंत्री राणा यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link