धामपुर साखर कारखान्याच्या ऊस क्षेत्रात १०४ हेक्टरची घट

धामपुर : नुकत्याच झालेल्या ऊस सर्वेक्षणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी धामपूर साखर कारखान्याच्या परीक्षेत्रात ऊस लागवडीमध्ये १०४ हेक्टरची घट झाल्याचे दिसून आली आहे. मागील वर्षी ऊस लागवडीचे क्षेत्र ५१,९३७ हेक्टर होते. जे या वर्षी घटून ५१,८३३ हेक्टरवर आले आहे. कारखान्यातील अधिकाऱ्यांच्या म्हण्यानुसार दर वर्षी शेती क्षेत्रात नवीन वसाहती तयार होत आहेत. नवीन पेट्रोल पंप सुरू होत आहेत. शाळा, कॉलेजे स्थापन होत आहेत. अशातच साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढवण्यावर जास्त जोर दिला आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धामपूर साखर कारखान्याचे व्यवस्थापक ओमवीर सिंह यांनी सांगितले की या वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडीत १०४ हेक्टर घट झाली आहे. यावर्षी लागवड क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत तीन टक्के वाढीची अपेक्षा होती. मात्र, असे झालेले नाही. २० एप्रिल ते २२ जूनअखेर झालेल्या सर्व्हेतून उपलब्ध आकडेवारीनुसार यावर्षीचे लागवड क्षेत्र ५१,८३३ हेक्टर आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र ५१,९३७ हेक्टर होते. यापैकी २३,८३८ हेक्टर लावण आहे तर २७.९९५ हेक्टर खोडवा ऊस आहे. आता कारखान्याने ऊस क्षेत्र वाढण्याऐवजी उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले जाणार असल्याचे सागितले. गेल्या वर्षी ऊस उत्पादन ८६४ क्विंटल प्रती हेक्टर होते. यंदाच्या हंगामात ते ८७५ हेक्टरवर पोहोचले असून ते पुढील हंगामात ९०० हेक्टरपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here