ऊस थकबाकीप्रश्नी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

नवांशहर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नवांशहर सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ५४ कोटी ७६ लाख रुपयांच्या ऊस बिलांची मागणी करत संयुक्त किसान मोर्चाच्या मदतीने नवाशहरमधील चंदीगढ चौकात धरणे आंदोलन केले. यापूर्वी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यासमोर आंदोलन केले होते.

यावेळी संयुक्त किसान मोर्चाचे नेते कुलदिप सिंह, हरमेश सिंह ढेसी, तरसेम सिंह बैंस, कुलदीप सिंह, भूपिदर सिंह वड़ैच व अमरजीत सिंह बुर्ज यांनी सांगितले की, नवांशहर साखर कारखान्यांकडे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. मात्र, कारखाना प्रशासन पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. जर प्रशासनाने पैसे देण्याची कार्यवाही लवकर केली नाही तर शेतकरी आपले आंदोलन तीव्र करतील असा इशारा देण्यात आला.

यावेळी शेतकरी नेत्यांनी आंदोलनस्थळी आलेल्या नवाशहरच्या उप जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे थकबाकी मागणी करणारे निवेदन दिले. यावेळी बलिहार सिंह संधू, हरविंदर सिंह व परमजीत सिंह आदी उपस्थित होते. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here