शेतकर्‍यांची ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवली जावी : भाकियू

98

हापुड : भारतीय किसान यूनियनच्या मासिक बैठकी मध्ये शेतकर्‍यांच्या समस्येवर चर्चा करण्यात आली. प्रशासनकिय अधिकार्‍यांकडून लवकरात लवकर साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची जवळपास 900 करोड रुपयांची थकबाकी मिळवून देण्याबाबतची मागणी करण्यात आली. याबाबत जिल्हा मुख्यालयाला निवेदनही देण्यात आले.

बैठकी मध्ये वक्त्यांनी सांगितले की, सिभावली, ब्रजनाथपूर, मोदीनगर साखर कारखान्याकडून ऊस शेतकर्‍यांचे जवळपास 900 करोड रुपये देय आहेत. शेतकरी आपल्या दैनंदिन गरजाही पूर्ण करु शकत नाहीत. पण सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. लवकरात लवकर शेतकर्‍यांची थकबाकी भागवावी. थकबाकी भागवेपर्यंत शेतकर्‍यांकडून विजेच्या बिलांची वसुली केली जावू नये. शेतकर्‍यांची विज बिले दुरुस्त करावीत. कुचेसर रोड वर चौपला वर इफ्को ची दुकान बंद आहे. त्याला चालू करावे. शेतकर्‍यांना उर्वरकांचा पुरवठा केला जावा. ग्रामीण भागामध्ये निराधार पशुंना पकडावे. शेतांवर बाईकवरुन जाणार्‍या शेतकर्‍यांचे चालान करु नये.

यावेळी गंगासरण अध्यक्षस्थानी होते तर रामपाल सिंह यांनी संचालन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष धनवीर शास्त्री, कुशल पाल आर्य, दिनेश खेडा, रामपाल सिंह, सुरेश चौहान, चौधरी यशवीर सिंह, बब्बल चौधरी, श्यामसुंदर, जतिन चौधऱी, नितिन बाना, दिनेश त्यागी, ज्ञानेश्‍वर त्यागी, हरेंद्र सिंह, र्रवीर सिंह, मुकेश त्यागी, हर्ष चौधऱी, प्रदीप तेवतिया आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here