टिकौला साखर कारखान्याकडून २४ कोटींची ऊस बिले अदा

मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगरमधील टिकौला साखर कारखान्याने २४ कोटी रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत. सध्याच्या गळीत हंगामात टिकौला साखर कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यात आघाडी घेतली आहे. टिकौला साखर कारखान्याने आता ५५.५६ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. याशिवाय, खतौली, मन्सुरपूर, खाईखेडी आणि रोहाना साखर कारखान्यांकडूनही ऊस बिले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात जवळपास २ लाख हेक्टर शेतजमीन आहे. यापैकी २०२०-२१ मध्ये १.७३६९६ लाख हेक्टर जमिनीवर १६०८ लाख टन ऊस उत्पादन केले आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी ८ साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दरवर्षी जवळपास ३ हजार कोटी रुपयांची ऊस बिले अदा केली जातात.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात चांगले ऊस बियाणे आणि किड, रोगांवर नियंत्रण चांगले मिळवल्याने शेतकरी खुश आहेत. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले की, उत्तरेकडील ऊस उत्पादक शेतकरी खुश आहेत. या भागातील को ०२३८, को ०११८ यांच्यासह नव्या ऊसाच्या प्रजाती कोएस १३२३५, कोएलके १४२०१ आदींचा वापर केला जात आहे. ऊस शेतीमधील परिवर्तनातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. प्रगत बियाण्यांपासून शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढले आहे. दर आठवड्याला ऊस बिले दिली जात असल्याचे टिकौला साखर कारखान्याचे संचालक निरंकार स्वरुप यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत शेतकऱ्यांना २०० कोटी रुपयांहून अधिक बिले दिली गेली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here