शेतकऱ्यांनी नोंदणीपेक्षा जास्त आणलेला ऊस साखर कारखाना प्रशासनाकडून जप्त

अमरोहा : कालाखेडा, हसनपूर येथील दि किसान सहकारी साखर कारखान्याने नोंदणीपेक्षा जास्त आणलेला ऊस जप्त केल्याचा आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. ही व्यवस्था बदलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी कारखान्यात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी मुख्य व्यवस्थापक राहुल यादव यांनी सांगितले की, ऊसाची रिकव्हरी कमी होत आहे. उसाची गुणवत्ता कमी असल्याने अशी वेळ आली आहे. तोडणी पावतीपेक्षा जादा उरलेला ऊस आधी शेतकरी परत घेवून जातात. आणि नंतर तो पुढील पावतीबरोबर आणतात. त्यामुळे उसाचा उतारा घटत आहे असे ते म्हणाले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जर एखादा शेतकरी तोडणी पावतीपेक्षा जास्त ऊस घेवून आला तर तो जप्त केला जाईल, असा इशारा कारखान्याच्या सरव्यवस्थापकांनी दिला होता. तो ऊस जप्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सरव्यवस्थापकांनी सांगितले. मात्र, कुंदरगी भुड येथील शेतकरी हितेश त्यागी यांनी आपण आणलेला साडेचार क्विंटल ऊस कारखान्याने जप्त केल्याचे सांगितले. गंगाचोली येथील शेतकरी महावीर शर्मा यांनी असाच प्रकार घडत असल्याचे आणि हे चुकीचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसोबत अन्याय केला जात असल्याचे बालानागल येथील शेतकरी सतेंद्र सिंह म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here