मुरादाबाद: दोन वर्षात ऊसाचा कॅन्सर नष्ट होणार

मुरादाबाद : ऊस विभागाने रोगग्रस्त ऊसाच्या सीओ ०२३८ या प्रजातीला दूर सारले आहे. शेतकऱ्यांना यापेक्षा दुसऱ्या प्रजातीची निवड करण्यास सांगण्यात आले आहे. तशा प्रकारचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. विभाग आणि साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना चांगले बियाणे दिले आहे. यावर्षी को ०२३८ या प्रजातीचे क्षेत्रफळ चांगलेच घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही प्रजाती शेतातून हद्दपारच होईल.

विभागातील साखर कारखान्यांना नव्या प्रजातीचे बियाणे देण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. विभागाकडूनही तसे बियाणे दिले जात आहे. मुरादाबाद नव्हे तर उत्तर प्रदेशातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये उसावर लाल सड रोगाचा फैलाव झाला. याला उसाचा कॅन्सर असेही म्हटले जाते. यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पिक रोगमुक्त करण्यासाठी अधिक प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अजय सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, को ०२३८ या प्रजातीवर किडींचा अधिक हल्ला होतो. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे रोगमुक्त प्रजातीच्या उसाची लागण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी दोन वर्षात को ०२३८ प्रजातीचा ऊस विभागात दिसणार नाही. ०२३८, १५०२३, १३२३५ आणि १४०१ या प्रजातीवर किडींचा धोका अधिक आहे. त्यामुळे ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून चांगले बियाणे दिले जात आहे असे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अजय सिंह यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here