ऊस आयुक्तांनी ऐकल्या शेतकऱ्यांच्या समस्या

172

बाजपूर : ऊस तथा साखर आयुक्त हंसा पांडे यांनी ऊस विकास समिती आणि विकास परिषदेची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखर कारखाने सुरू करण्याची मागणी केली.

गुरुवारी आयोजित मेळाव्यात आयुक्त पांडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना ऊस संशोधन केंद्रातून बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. साखर कारखाना १० नोव्हेंबरपर्यंत गाळप हंगाम सुरू करु शकेल यासाठी तयारी सुरू करावी असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. उसाचे को ०२३८ हे बियाणे रोगाला बळी पडत असल्याने त्यांनी शहाजहापूर येथील ऊस संशोधन केंद्रातून बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

बाजपूर येथे पहिल्यांदाच आलेल्या आयुक्तांचे भारतीय किसान युनियनचे प्रदेश अध्यक्ष करम सिंह पड्डा यांनी शाल भेट देऊन सत्कार केला. ऊस विभागाचे संचालक कपिल मोहन आणि ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक महेश प्रसाद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी दलजित सिंह रंधावा, सुनील डोगरा, जसवीर सिंह, पाल सिंह, रामपाल सिंह, मुरलीधर आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here