ऊस समितीचे नवे 800 सदस्य

115

बिजनौर : जिल्ह्यामध्ये ऊसाच्या शेतांवर ऊस सर्वे करणार्‍या पथकांद्वारा समितीचे नवे सदस्य बनवणे सुरु झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 800 च्या जवळपास नवे सदस्य बनले आहेत. येणार्‍या हंगामामध्ये हे नवे सदस्य साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करतील. जिल्ह्यामध्ये ऊस सर्वे जोरात सुरु आहे.

जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना क्षेत्रात ऊस सर्वे सुरु आहे. जिल्ह्यामध्ये यावेळी जवळपास 550 सर्वे पथक सर्वेक्षणाच्या कामात आहेत. ऊसाच्या शेतांवर सर्वे करणार्‍या पथक समित्यांनी नवे सदस्य बनवले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 800 नवे सदस्य बनवण्यात आले आहेत. हे सारे सदस्य येणार्‍या ऊस हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करतील. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, 800 च्या जवळपास नवे सदस्य बनले आहेत. जे शेतकरी या समितीचे सदस्य बनण्यास इच्छुक आहेत त्यांनी आपल्या ऊसाचा सर्वे करुन घ्यावा. जमीनीच्या खतौनी कडे तीन फोटो सर्वे करणार्‍या पथकाला उपलब्ध करुन द्यावेंत. त्यांना समितीचे नवे सदस्य बनवून घेतले जाईल. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यंनी सांगितले की, शेतकर्‍यांनी सर्वे दरम्यान शेंतावर उपस्थित असावे. आणि सर्वे केल्यानंतर स्लिप घ्यावी, जेणेकरुन ऊस समस्यांची अडचण उद्भवू नये. जवळपास 550 पथके सर्वे करत आहेत. शेतकर्‍यांना एसएमएस पाठवले जात आहेत. जे शेतकरी सर्वे आपल्या समोर करतील त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here