नवी दिल्ली : मान्सुनच्या पावसात झालेली घट आणि गेल्या आठवड्यात उत्तर भारताच्या बहुसंख्य भागात सातत्याने झालेल्या अवकाळी पावसामुळे भात, ऊस पिकासह काही भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. काही राज्यांतील खरीप पिकांची हानी झाली आहे. गेल्या आठवड्यात जोरदार पावसाचा पंजाबमध्ये १.५ लाख हेक्टरमधील भात पिकाला फटका बसला होता. कृषी विभागाच्या आपत्कालीन सर्वेक्षणानुसार काही राज्यांत शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, पिकांच्या नुकसानीशिवाय दक्षिण-पश्चिम मान्सून मागे सरकल्याने अचानक पाऊस कोसळला. यामुळे उत्तर प्रदेश, हरियाणात भात, बाजरी, ज्वारीच्या तोडणीस उशीर होवू शकतो.
CNBCTV18 मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पावसामुळे उत्तर प्रदेशात उशीरा झालेल्या भाजीपाला लागवडीचेही नुकसान होवू शकते अशी भीती शेतकऱ्यांना आहे. युपीच्या काही भागात ऊस पिकाचेही नुकसान झाले आहे.