हसनपूर साखर कारखान्यामध्ये ऊस गाळप क्षमता वाढेल

समस्तीपूर : हसनपूर साखर कारखान्यामद्ये ऊस गाळप क्षमता वाढवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहेत. यासाठी तीन राज्यातून आलेल्या इंजिनिअरर्सची टीम कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या कामात व्यस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2020-21 च्या हंगामामध्ये 85 लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पुढचा ऊस गाळप हंगाम पाच महिन्यांचा असेल. नोव्हेंबर ते मार्च पर्यंत साखर कारखाना ऊस गाळप करेल. 2019-20 हंगामात प्रतिदिवस 50 हजार क्विंटल ऊस गाळपाची क्षमता होती . आता आगामी हंगामामध्ये गाळप क्षमता 65 हजार क्विंटल प्रतिदिन असेल. शेतकर्‍यांना ऊसाचे पैसे भागवण्यात येत आहेत. 10 मार्च पर्यंत ऊसाचे पैसे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. ऊस उपाध्यक्ष शंभू प्रसाद राय म्हणाले, शेतकर्‍यांचे कष्ट पाहता साखर कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. जेणेकरुन पाच महिन्यांच्या आत ऊस गाळप वेळेवर होवू शकेल.

साखर कारखान्याने 1 अरब 49 करोड 52 लाख 84 हजार 512 रुपयांची ऊस थकाबाकी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली आहे. 41करोड 47 लाख 77 हजार 956 रुपये अजूनही देय आहेत. ऊस उपाध्यक्ष यांनी सागितले की, थांबून थांबून होणार्‍या पावसामुळे ऊसाच्या पीकांना फायदा होत आहे. शेतामध्ये ऊस पीकांचे परीक्षण केले जात आहे. शेतकर्‍यांना शेतावर बोलावून पीकांच्या व्यवस्थापनाची माहिती दिली जात आहे. जेणेकरुन ऊसाचे उत्पादन अधिक चांगले होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here