साओ पाउलो : युनिका (Unica)उद्योग समूहाने सांगितले की, २०२२-२३ या गळीत हंगामात अधिक साखर कारखान्यांचा सहभाग असल्याने ब्राझीलच्या मध्य-दक्षिण ऊस गाळपाने एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजारातील अनुमानांना मागे टाकले आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत एकूण २३.८३ मिलियन टन गाळप झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन १९.७ टक्क्यांनी कमी आहे. मात्र, आर्थिक सूचना प्रदाता कंपनी एसअँडपी ग्लोबल प्लेट्सद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या विश्लेषणानुसार हे गाळप २१.२६ मिलियन टन या अंदाजापेक्षा अधिक झाले आहे. Unica ने दिलेल्या माहितीनुसार, साखर उत्पादन ९,३४,००० टनापर्यंत पोहोचले आहे. यामध्ये गेल्या वर्षी ३८.७ टक्यांची घसरण झाली होती. तर इथेनॉल उत्पादन १५.८ टक्क्यांनी घटून १.०९ बिलियन लिटर झाले आहे. या इथेनॉल टेडामध्ये मक्क्यापासून तायर करण्यात इंधनाचाही समावेश आहे.
युनिकाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल अखेरपर्यंत १८० कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली होती. तर महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत केवळ ८५ पेक्षा अधिक कारखानेच सुरू होते. कारखाने सुरू होण्याची ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या समान कालावधीत सुरू असलेल्या २०७ कारखान्यांच्या तुलनेत अद्यापही कमी आहे. मेच्या पहिल्या पंधरवड्यात आणखी ५७ कारखाने सुरू होतील अशी अपेक्षा आहे. युनिकोने म्हटले आहे की, एप्रिलच्या सुरुवातीला साधारणतः ६२.८ टक्के पिक इथेनॉल उत्पादनासाठी देण्यात आले होते. एक वर्षापूर्वी हे ५५.५ टक्के होते.