सप्टेंबरच्या सुरुवातीपासून ब्राझीलमधील ऊस गाळपात २.५ टक्क्यांची वाढ

साओ पाउलो : सप्टेंबरच्या पहिल्या सहामाहीत ब्राझीलच्या मध्य-दक्षिण विभागात उसाचे एकूण ३९.४९ दशलक्ष टन गाळप झाले आहे. एक वर्षाच्या तुलनेत ते सुमारे २.५% जास्त आहे, असे Unica उद्योग समुहाने मंगळवारी सांगितले. या कालावधीत साखर उत्पादन १२.२ टक्के वाढून २.८६ मिलियन टनापर्यंत पोहोचले. तर इथेनॉल उत्पादन २ टक्के वाढून २.१२ बिलियन लिटर झाले. Unica च्या इथेनॉल डेटामध्ये मक्क्यापासून उत्पादित इंधनाचाही समावेश आहे.

ब्राझीलच्या मध्य-दक्षिण (CS) विभागात अधिक अनुकूल हवामानामुळे आणि कारखान्यांद्वारे साखर उत्पादनावर भर दिल्याने ऊस गाळपासह साखर उत्पादनात वाढ होण्याचे अनुमान वर्तविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here