तामिळनाडू : अंमुंडी येथील वेल्लोर सहकारी साखर कारखान्यात 2019-20 च्या ऊस गाळप हंगामास सोंमवारपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी ए. शामुंगा सुंदरम यांच्यासह इतर अधिकार्यांच्या हस्ते गाळप हंगामाचे उद्घाटन करण्यात आले.
ते म्हणाले, 18 डिसेंबरपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप हंगाम सुरु राहणार आहे. चालू हंगामात 1.05 लाख टन ऊस गाळप केला जाईल, तसेच दररोज 2000 टन ऊस गाळप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 2018-19 च्या हंगामात ऊस उत्पादकांना प्रति टन 2,612.50 देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्यातील कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी देखभाल आणि दुरुस्तीची काम केली जात असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.