पुणे : महाराष्ट्रात ऐतिहासिक रुपात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा २०२१-२२ या हंगामाची मंगळवारी समाप्ती झाली. यासोबतच राज्यात १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी हंगामात उच्चांकी साखर उत्पादन होण्याचे अनुमान आहे.
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी जवळपास १३८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. राज्यातील साखर उद्योगाच्या स्थापनेनंतर आजवरचे हे सर्वाधिक उत्पादन आहे. २४० दिवसांच्या गाळपासह २०२१-२२ या हंगाम सर्वाधिक दीर्घ कालावधीचा हंगाम ठरला आहे.
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, महाराष्ट्राने साखर उत्पादनात चीन, रशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशानांही मागे टाकले आहे. ब्राझीलनंतर हे सर्वात मोठे साखर उत्पादक क्षेत्र बनले आहे. या वर्षी भारताने जगात सर्वाधिक साखर उत्पादीत करून ब्राझीलला दुसऱ्या क्रमांकावर टाकले आहे. पुढील वर्षीही महाराष्ट्र चालू गळीत हंगामातील आपलाच उच्चांक मोडून काढेल अशी शक्यता आहे. ते म्हणाले की, सद्यस्थितीत पुढील वर्षीच्या ऊस लागवड क्षेत्राचा आढावा घेण्यात येत आहे. ९५ टक्के साखर कारखान्यांनी आम्हाला सांगितले आहे की, त्यांच्या कार्यक्षेत्रात लागवड करण्यात आलेला ऊस यावर्षीपेक्षा निश्चितच अधिक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ऊस तोडणी टाळण्यासाठी राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयाकडून २०२२-२३ या हंगामात गाळप लवकर सुरू करण्याचा प्रस्ताव दिला जात आहे. हा हंगाम आणखी चार महिने लांब आहे.
महाराष्ट्राने १३२० लाख टन उसाचे गाळप करून उच्चांक प्रस्थापित केला आहे. साखर कारखान्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना ३७.७१२ कोटी रुपयांची एफआरपी दिली आहे. शेतकऱ्यांना एकूण देय असलेल्या एफआरपीच्या तुलनेत ही ९५.२८ टक्के एफआरपी आहे. राज्य सरकारला चालू गळीत हंगामात ऊसाच्या अतिरिक्त गाळपासाठी संघर्ष करावा लागला. कारण तोडणी मजुरांनी एप्रिल आणि मे महिन्यात काम करण्यास नकार दिला होता. पुढील वर्षी मशीनद्वारे
तोडणीचे क्षेत्र वाढविले जाणार आहे.