सत्तासंघर्ष शिगेला, 200 साखर कारखान्यांचा गाळप धोक्यात

कोल्हापूर : सत्तारोहण कोणाचे होणार याबाबत निश्‍चितता नाही. याचा परिणाम साखर उद्योगावर होत आहे. सत्ताबाजाराचे चित्र स्पष्ट नसल्याने मंत्री समितीची बैठक होऊ  शकत नाही. किंबहुना सत्तेच्या साठमारीत त्याकडे पाहण्यास कुणासही वेळ नाही. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊ न शेतकर्‍यांना मदत करण्याबाबत मंत्र्यांच्या झालेल्या तातडीच्या बैठकीत ऊस गळीत हंगाम सुरु  करण्याचा विषय नव्हता. त्यामुळे आता मुख्यमंत्री निवड, शपथविधी, नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्याशिवाय मंत्री समितीची बैठक अवघड आहे.

त्यामुळे राज्यातील तब्बल 200 सखर कारखान्यांचा गाळप हंगाम धोक्यात आला आहे. यावर्षी गाळप परवान्यांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दोन महिने आधी राबविण्यात आली. 31 ऑगस्ट अखेर अर्ज स्वीकारले जाणार असल्याबाबतचे परिपत्रक साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले होते. प्रशासकीय पातळीवर साखर कारखाने सुरू करण्याची सिद्धता झाली आहे. मात्र दरम्यानच्या काळात निवडणुका झाल्या. नव्या सरकारअभावी मंत्री समितीची बैठक अद्याप झालेली नाही. यामुळे अनेक धोरणात्मक निर्णयांमध्येच ऊस गाळप हंगामाबाबतही धोरणात्मक निर्णय रखडला आहे. यामुळे साखरउद्योगोपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here