महाराष्ट्रात १८७ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू

136

महाराष्ट्रातील गाळप हंगामाने आता गती घेतली आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये २२ डिसेंबर २०२१अखेर महाराष्ट्रात एकूण १८७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९४ सहकारी तर ९३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ३९७.७९ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर ३७९.०९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.५३ टक्के आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक ४३ साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २२ डिसेंबर २०२१ अखेर सोलापूर विभागात ९५.६६ लाख टन उसाचे गाळप झाले असून ८२.४५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ८.६२ टक्के आहे.

कोल्हापूर विभागाचा साखर उतारा १० टक्क्यांवर आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन याच विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात ९७.७४ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०५.९३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा १०.८४ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here