ओडिसातील नदीकाठी ३० वर्षानंतर बहरतेय ऊस शेती

सिमुलिया: सुमारे ३० वर्षांपूर्वी बालासोर जिल्ह्यातील सिमुलीया विभागातील अनेक शेतकरी ऊस शेती करत असत. मात्र, अनेक कारणांनी त्यांना हे नगदी पिक घेणे बंद करावे लागले. आता पुन्हा एकदा या भागातील शेतकरी ऊस शेतीकडे वळल्याचे दिसू लागले आहे.

हरिसिंहपूर पंचायतीच्या शेकडो शेतकऱ्यांनी ३० वर्षांनंतर ऊस शेती पुन्हा सुरू केली आहे. यंदा या पिकाला पाच महिने उशीर झाला आहे. लागणीस उशीर झाल्यामुळे उत्पादनात घट येण्याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. कन्साबंसा नदीकाठावरील शेती अशा प्रकारची नगदी पिके घेण्यासाठी चांगली आहे. तर स्थानिक हवामानही ऊस उगविण्यासाठी उपयुक्त आहे.
दरवर्षी कंसबंसा नदीकाठावरील अंकुला, कबीरपूर आणि हरिसिंगपूर या भागातील शेकडो एकर भात शेतीला पुराचा मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतकरी आता पिक बदलू लागले आहेत. भाताची शेती मोठ्या प्रमाणावर नष्ट होत असून शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन नापिक होऊ लागली आहे. पुरामुळे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ लागली आहे. त्यामुळे भाताऐवजी ऊस पिकवणे हे येथील शेतकऱ्यांसाठी पर्याय असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

येथील गाळाची जमीन ऊस शेतीसाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते. गेल्यावर्षी सहा शेतकऱ्यांनी ऊस शेती करण्यात रुची दर्शविली. त्यांनी कृषी तथा उद्यान विभागाशी संपर्क साधला. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिल्याने साधारणतः दहा एकर क्षेत्रात ऊस शेती सुरू झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here