विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

माढा : पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातर्फे ऊस लागवड धोरण जाहीर करण्यात आले आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी लवकर पक्व होणाऱ्या आणि जादा शर्करायुक्त जातीच्या वाणाची लागवड शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन केले आहे. ऊस लागवड धोरणानुसार आडसाली हंगामात को.एम.- ०२६५, को – ८६०३२, व्हीएसआय- ८००५, पीडीएन- १५०१२ आणि कोव्हीएस आय -१८१२१ या जातीच्या वाणांची लागवड करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर पूर्व हंगामी व सुरु ऊस लागवड हंगामात को एम – ०२६५ वाणाची लागण करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे या हंगामासाठी कारखान्याने त्रिस्तरीय बेणेमळा योजना राबविली आहे. यामध्ये पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (पुणे) येथून नवीन ऊस बेणे आणून त्याचे काही निवडक शेतकऱ्यांच्या शेतात बेणे प्लॉट बनवले आहेत. त्याचबरोबर कारखान्याच्या प्रेसमडपासून तयार केलेले कंपोस्ट खत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यावेळी कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मनेजर सुहास यादव, ऊस विकास अधिकारी नारायण लगड, संभाजी थिटे, , संभाजी जगताप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here