ऊस तोडणी कामगार प्रश्न : शरद पवार-पंकजा मुंडे यांची 4 जानेवारीला बैठक

बीड : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीत दरवाढ करावी, या प्रमुख मागणीबाबत ५ जानेवारीपर्यंत तोडगा न निघाल्यास कोयता बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्यातील ऊसतोड कामगार संघटनांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर साखर संघ आणि कामगार संघटनांची नुकतीच बैठक झाली होती. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, मजुरीवाढीच्या प्रश्नावर विचार विनिमयासाठी खा. शरद पवार आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या लवादाची बैठक उद्या (दि. 4) शिर्डीत होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

साखर संघाने कामगारांच्या मजुरीत २९ टक्के दरवाढ करण्याची तयारी साखर संघाने दाखवली आहे. तर ऊसतोड कामगार संघटना ४० टक्के दरवाढीवर ठाम आहेत. त्यामुळे यावर कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाने दरवाढीचा अंतिम निर्णय घ्यावा यावर साखर संघ व ऊसतोड मजूर संघटनांचे एकमत झाले. त्या अनुषंगाने ४ रोजी ही लवादाची बैठक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here