मेरठ : किनौनी साखर कारखाना शंभर टक्के ऊस बिले देण्यात अपयशी ठरली आहे. ऊस बिले देण्यासाठी ऊस विभागाने कारखान्याला नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांच्या दबावामुळे ऊस विभागाने कडक पावले उचलली आहे.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गेल्या हंगामात जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांनी शत प्रतिशत बिले दिली आहेत. मात्र, किनौनी साखर कारखाना असा आहे की, ज्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील पूर्ण ऊस बिले दिलेली नाहीत. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, किनौनी साखर कारखान्याच्या संचालकांना नोटीस जारी करण्यात आली आहे. यावेळी जर बिले दिली नाहीत, तर कडक कारवाई केली जाईल.
उत्तर प्रदेशात निवडणुकीचा माहोल आहे. ऊस विभाग थकबाकी वसुलीसाठी कठोर भूमिका घेत आहे. कारखान्यांनी लवकरात लवकर बिले द्यावीत यासाठी प्रयत्न चालवले आहेत.