रोप निर्मितीतून महिलांना रोजगार देणार ऊस विभाग

सहारनपूर : ऊस विभाग सिंगल चिप बड़ मेथड च्या माध्यमातून ऊस शेतीला प्रोत्साहित करण्याबरोबरच ग्रामीण महिलांना रोजगार मिळवून देणार आहे. विभाग, महिलांचे समूह बनवून सिंगल चिप बड़ मैथेड च्या माध्ययमातू ऊसाची नर्सरी तयार करेल आणि रोपांना स्वतः खरेदी करून शेतकऱ्यांना देईल. हे काम राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन अंतर्गत होईल.

विभागाच्या म्हणण्या नुसार सिंगल चिप बड़ मेथड मध्ये ऊसाचा डोळा कापून लागवड केली जाते ज्यामुळे बियाणे कमी प्रमाणात लागतात व फुटवा चांगला होतो व उत्पादनही वाढते. या टेक्निकला गती देण्याबरोबरच विभाग ग्रामीण महिलांना रोजगाराशी जोडण्याचे काम करेल.

जिल्हा ऊस अधिकारी केएम मणि त्रिपाठी यांनी सांगितले की, 10-10 महिलांचे समूह बनवून सिंगल चिप बड टेकनिक च्या माध्यमातून ऊसाची रोपे तयार केली जातील. यामध्ये प्रति रोपासाठी विभाग महिलांना 3.50 रुपये देईल. आणि प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून रोपांची शेतामध्ये लागवड करेल, जेणेकरून नव्या तंत्राला गती मिळू शकेल.

महिलांकडून रोप तयार करुन घेण्याबरोबरच ऊस विभाग सिंगल चिप बड़ तंत्राचे प्रदर्शनही आयोजीत करेल. डीसीओ केएम मणि त्रिपाठी यांनी सांगितले की, राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन अंतर्गत जिल्ह्यात 294 हेक्टर मध्ये चिप बड च्या प्रदर्शनाचे लक्ष्य आहे. प्रति हेक्टर 9 हज़ार रुपयाचे बजेट आहे.

यावर्षीही जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्रफळ 10 टक्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सर्वे च्या सुरुवातीला ही गोष्ट समोर आली. ऊस अधिकाऱ्यांच्या अनुसार, गागलहेड़ी व गांगनौली कारखाना क्षेत्रा मध्ये ऊसाचे क्षेत्रफळ वाढत आहे तर सरसावा व टोडरपुर क्षेत्रामध्ये कमी झाले आहे. सर्वेच्या सुरुवातीला 5 ते 10% पर्यंत ऊस क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here