डिजिटल इंडियाचे स्वप्न ऊस विभाग साकारणार, समिती सदस्यत्व मिळणार ऑनलाईन

123

मेरठ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या प्रयत्नांतून ऊस विभाग याच दिशेने प्रयत्न करीत आहे. ईआरपी प्रणालीच्या पारदर्शी व्यवस्थेतून शेतकऱ्यांना समितीचे सदस्यत्व ऑनलाईन दिले जाणार आहे. ऑनलाईन सदस्यत्व घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना enquiry.caneup.in या वेबसाईटवरुन त्यासाठी अॅप्लिकेशन करावे लागेल. यासाठी शेतकऱ्यांना फोटो, बँक पासबूक, ओळखपत्र, घोषणापत्र, शेतीची माहिती वेबसाइटवर अपलोड केले जातील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन सदस्यत्वासाठी कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविले जाणार आहे.

मेरठमधील ऊस विभागाचे उप आयुक्त राजेश मिश्र यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या ऑनलाईन सदस्यत्वाबाबत विभागीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन सदस्यत्वासाठी नोंदणी, शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासणी, सदस्यत्व देणे याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्याची रिसिट मिळेल. ही रिसिट घेऊन नंतर शेतकरी २२१ रुपये शुल्क भरून कम्प्युटर जनरेटेड रिसिट घेऊ शकतात.

ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना एक आठवड्यात अर्ज स्वीकारला अथवा नाकारला याबाबत एसएमएसद्वारे कळवले जाईल. सदस्यत्व मिळणाऱ्या शेतकऱ्याला आठवडाभरात प्रमाणपत्र मिळेल. आतापर्यंत ऊस तथा साखर कारखाना समित्यांकडून सदस्यत्वासाठी मॅन्युअल प्रक्रिया केली जात होती. त्यामुळे शेतकरी दलालांच्या साखळीत सापडत होता. आता शेतकऱ्यांचे विभागाचे कर्मचारी, दलालांवरील अवलंबित्व कमी होईल. यासोबतच शेतकरी घरबसल्या समितीचे सदस्यत्व मिळवू शकतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा</spa
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here