भीमाशंकर ला ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्रदान

मंचर : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक यांचा सन 2018-19 हंगामासाठी दत्तात्रयनगर पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला शिरोळ पुरस्कृत कै. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संर्वधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माजी कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

याप्रसंगी नाम. जयंत पाटील,नाम. बाळासाहेब थोरात, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे, विजयसिंह मोहिते, हर्षर्वधन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर ,विविध कारखाण्याचे अध्यक्ष व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here