सक्ती करुनही साखर कारखान्यांकडून ऊस थकबाकी देय

रामपूर : साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ऊस थकबाकी देय आहे. सरकार आणि कोर्टाने कडक कारवाईचे आदेश देवूनही हे पैसे भागवले जात नाहीत. ऊस गाळप हंगामाच्या नव्या सत्राची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरु करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, पण जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी अजूनपर्यंत शेतकर्‍यांची थकबाकी दिलेली नाही. कोर्टाच्या निर्देशानुसार व शासनाचा अल्टीमेटम मिळूनही कारखान्यांनी शेतकर्‍यांची करोडो रुपयांची थकबाकी दिलेली नाही. या कारखान्यांवर आता सुद्धा शेतकर्‍यांचे 33 करोड 57 लाख रुपये देय आहेत.

मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्यांना 31 ऑक्टोबर पर्यंत शेतकर्‍यांचे सर्व पैसे भागवण्याचा अल्टीमेटम दिला होता, पण या कारखान्यांवर या आदेंशाचा काहीही परिणाम झालेला नाही. कोर्टाने राज्य सरकारला एका महिन्याच्या आत शेतकर्‍यांचे सर्व पैसे भागवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. ऊस आयुक्तांनी देखील थकबाकी बाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की, कारखान्यांनी चालू गळीत हंगाम सुरु करण्याआधी उरलेली सर्व थकबाकी भागवावी. ऊस अधिनियमानुसार 14 दिवसांच्या आत ऊसाचे पैसे दिले नाहीत तर कारखान्यांनी 14 टक्के व्याज देण्याचा नियम आहे. उच्च न्यायालयाने प्रत्येक वर्षी व्याज देण्याचे आदेश दिले आहेत, पण साखर कारखाने याकडे दुर्लक्ष करतात.

थकबाकीसाठी शेतकर्‍यांद्वारा आंदोलने झाल. अगदी जिल्हा ऊस अधिकार्‍यांना घेरावही घातला गेला होता. या दरम्यान, जिल्हा ऊस अधिकार्‍यांना रोखून ठेवले होते. यावर डीसीओ ने तीन कारखान्याच्या अधिक़ार्‍यांना तिथे बोलावून घेतले होते. शेतकर्‍यांनी त्या अधिकार्‍यांनाही घेराव घातला. पोलिसांनाही बोलवावे लागले होते. हे अधिकारी ऊस थकबाकी देत नाहीत, तेव्हा यांच्यावर एफआयआर दाखल करुन त्यांना अटक करण्यावर हे शेतकरी अडून बसले होते. यावेळी एका कारखान्याने थकबाकी भागवण्यासाठी काही वेळ मागितला होता. यानंतरही शेतकर्‍यांना टाळले गेले. यानंतरही अनेकदा धरणे आंदोलन केले गेले.

जिल्हाधिकार्‍यांनी देखील अनेकदा कारखाना अधिकार्‍यांची बैठक घेवून त्यांना लवकरात लवकर थकबाकी द्यावी अशी चेतावणीही देण्यात आली होती. तरीही करीमगंज स्थित राणा साखर कारखान्यावर 23 करोड रुपयांचे देय आहे. रुद्र विलास कारखान्यावर 10 करोड 57 लाख रुपये देय आहे. राणा कारखान्याने 89 करोड 48 लाख रुपये भागवले आहेत.  तर रुद्र विलास कारखान्याद्वारा 57 करोड 18 लाख भागवण्यात आले आहेत. थकबाकीसाठी नोटीसाही देण्यात आल्या आहेत. 12 नोव्हेंबर पर्यंत सर्व थकबाकी भागवली जाईल, असे जिल्हा ऊस अधिकारी हेमराजसिंह म्हणाले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here