दोन मजली इमारतींएवढया उंचीचा ऊस…

बागपत : बावली गावातील अमरपाल तोमर यांच्या शेतातील ऊसाने १८.५ फुटाची उंची गाठली आहे. या ऊसामुळे अमरपाल सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहेत. दोन मजली इमारतीच्या उंची एवढा हा ऊस आहे. ऊस पिकवण्याच्या या बदलत्या पद्धतीचा अवलंब करुन अमरपाल इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत दुपट उत्पन्न घेत आहेत. इंटर मीडिएट उत्तीर्ण अमरपाल यांच्या दहा एकर जमीनीत ते ऊस पिकवतात.

साधारणपणे ऊसाची उंची ९ ते १२ फुट पर्यंत असते, पण अमरपाल यांच्या शेतातील ऊस १८ .५ फुटावर पोचला आहे. अर्थात ऊसाच्या सरासरी उंचीपेक्षा ही दुप्पट आहे. बागपत मध्ये सरासरी ऊस उत्पादन ८३२ क्विंटल प्रति हेक्टर आहे, पण अमरपाल प्रति हेक्टर १८१२ क्विंटल पेक्षा अधिक उत्पादन घेत आहेत. एकदा ऊसाची लागवड केल्यानंतर अमरपाल ७ वर्षापर्यंत ऊसाचे पिक घेतात, तर सामान्यतः दोन -तीन वर्षापर्यंतच ऊसाचे पिक घेता येते. रासायनिक खतांचा वापर जास्त केला जात नाही. वर्षात प्रति हेक्टर १८० किलो डीएपी आणि ३१२ किलो रुपयाप्रमाणे ऐन पी चा प्रयोग केला जातो.

प्रत्येक वर्षी ४८ बुगी शेणखताचा वापर केला जातो. सध्या त्यांच्या शेतात कोसा -०२३८ किंवा ६९०१४ प्रजाती चे पीक घेतले जाते. अमर पाल यांनी म्हटल्याप्रमाणे, गेल्या वर्षी त्यांचा ऊस १९ फुट उंच होता, ज्यामुळे प्रति हेक्टर ५.८८ लाख रुपये मिळाले होते. सरासरी उत्पन्न २.७० लाख रुपये होते. यामुळे जाट महासभा बागपत यांनी अमरपाल यांना सन्मानित केले आहे. गेल्या वर्षी ऊस विभागाकडून आयोजित केलेल्या स्पर्धेत त्यांना २५ हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here