ऊस तोडणी न मिळाल्याने शेतकऱ्याचे विषप्राशन

961

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

हापुड (उत्तर प्रदेश): चीनी मंडी

बाबूगढ विभागातील हाजीपूर येथील एका तरुण शेतकऱ्याने उसाला तोड न मिळाल्याने विष प्राशन केले. त्याची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सध्या त्याच्च्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
हाजीपूर येथील धीरेंद्र या २५ वर्षीय शेतकऱ्याने शनिवारी दुपारी विष प्राशन केले. नातेवाईकांनी त्याला तातडीने कुचेसर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. धीरेंद्र याचे काका ब्रजपाल सिंह यांनी सांगितले की, उसाला तोडणी मिळत नसल्याने धीरेंद्र गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता. त्याच्या शेतातच उभा ऊस वाळून चालला आहे. उसाला तोड मिळावी यासाठी त्याने सिंभावली साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे वैतागलेल्या धीरेंद्र याने विष प्राशन केले. दरम्यान, पोलिसांनी या घटनेबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.
SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here