ऊसाचा दर 500 रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी

धामपूर :  भारतीय किसान संघाने (भाकियू) गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी ऊसाचा दर प्रति क्विंटल 500 रुपये करण्याची मागणी केेली आहे. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशच्या ऊस आयुक्त यांना साखर कारखान्यामध्ये ऊसाचे वजन करण्याच्या जुन्या पद्धतीचा अवलंब करण्याचा अनुरोध केला आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी, ही पद्धत अवलंबू नये यासाठी ऊस विभागाच्या अधिकार्‍यांना घेराव घालून चेतावणी दिली.

शेतकर्‍यांच्या या बैठकीमध्ये ब्लॉक अध्यक्ष हरिराज सिंह जाट म्हणाले, जिल्ह्यात अनेक कारखान्यांनी अजूनही ऊस थकबाकी दिलेली नाही. इथल्या ऊस आयुक्तांची कार्यशैली शेतकरी विरोधी असल्याचेही सांगितले. त्यांनी ऊस आयुक्तांना भेटून गेट पावत्यांच्या वजनाची जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी केेली आहे. शेतकर्‍यांनी सरकारला विजेच्या वाढत्या दरांना मागे घेवून, पिकांच्या सिंचनासाठी मोफत विजेची सोय करण्याची मागणी केली आहे. तसेच ज्येष्ठ शेतकर्‍यांना पेन्शन द्यावे अशीही मागणी केली आहे.

शेतकर्‍यांनी परिवहन राज्य मंत्री अशोक कटारिया यांच्याकडे ज्येष्ठ शेतकर्‍यांसाठी रोडवेज च्या बसेस मधून मोफत यात्रा सुविधा मिळावी याचीही मागणी केली आहे. या बैठकीत सत्यवीर, विजयपाल, छतरपाल, राजेंद्र सिंह, महेंद्र, महंशचंद, राजवीर सिंह, तेजपाल सिंह, गरीब सिंह, लोकेंद्र उपस्थित होते. गेल्या हंमागातील थकबाकी न दिल्यामुळे उत्तर प्रदेशातील ऊस शेतकरी चिंतेत आहेत. नवीन हंगाम आता लवकरच सुरु होणार आहे. ऊस शेतकर्‍यांचा दावा आहे की, त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे ते आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करु शकत नाहीत. मुलांच्या शाळेची फी देखील भरु शकत नाहीत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here