ऊस थकबाकीसाठी शेतकरी संघटनेने चळवळीचे धोरण आखले

शामली : प्रदेशा मध्ये ऊस थकबाकी वरुन भारतीय ऊस शेतकरी संघाने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आंदोलन करण्याची रणनिती तयार केली आहे.

बुधवारी भारतीय ऊस शेतकरी संघाची एक बैठक शामली कार्यलयावर आयोजित करण्यात आली. बैठकीला संबोधित करताना राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मलिक म्हणाले, प्रदेशात साखर कारखाने बंद होऊन 15 दिवस होऊन गेले आहेत आणि शेतकऱ्यांचे कारखान्यांकडून अजूनही 17 हजार करोड़ रुपये देय आहेत. सहारनपुर मंडल मध्ये आता पर्यत डिसेंबर चीही थकबाकी दिलेली नाही. 14 दिवसांनंतर थकबाकी वर मिळणारे व्याज ही कारखान्यांनी दाबून ठेवले आहेत.शेतकऱ्यांना आपला खर्च चालवण्यासाठी बँकाकडून कर्ज घ्यावे आणि विनाकारण व्याज द्यावे लागत आहे. जर शेतकऱ्यांचे पैसे भागवण्यात उशिर झाला तर भारतीय ऊस शेतकरी संघाकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्यामसिंह होते. बैठकीला पिंटू चौधरी, सुधीर मलिक, प्रवीण रोड, अशोक प्रधान, गौरव मलिक, बीरपाल सिंह, प्रवेन्द्र सभासद, आदि उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here