ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वेग, पूर्ण महामार्ग रोखण्याची घोषणा

जालंधर : पंबाजच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून रक्षाबंधनामुळे एक दिवसाची सुट्टी दिल्यानंतर उद्यापासून धरणे आंदोलनाला गती देण्याची घोषणा करण्यात आली. शेतकरी नेते मंजीत रॉय यांनी सांगितले की, तरुण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उद्यापासून महामार्ग रोखला जाईल. त्यांनी सांगितले की, सरकारने अद्याप झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे महामार्ग रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून संपूर्ण महामार्ग रोखला जाईल. सर्व शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन धरणे आंदोलनस्थळी एकत्र उपस्थित राहावे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ८ ऑगस्टपासून आपल्या ऊसाची थकीत बिले मिळावीत यासाठी आंदोलन सुरू केले आहे. फगवाडा साखर कारखान्याच्या चौकात पूर्ण हायवे रोखण्यात आला आहे. आता हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here