मुख्यमंत्र्यांकडून दरवाढीच्या आश्वासनानंतर बागलकोट जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

बागलकोट : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दरवाढीचे आश्वासन दिल्यानंतर बागलकोट जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस खरेदी दरात वाढीच्या मागणीसाठी गेल्या ५३ दिवसांपासून सुरू केलेले आपले आंदोलन मागे घेण्यात आले. हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

सोमवारी बागलकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोम्मई यांची भेट घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री बोम्मई यांनी पुढील सात दिवसांत या मुद्यांची सोडवणूक केली जाईल, असे आश्वासन दिले. जिल्ह्यात एक आठवड्यापासून आंदोलन तीव्र करण्यात आले होते. जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सी. सी. पाटील यांच्यासोबतची चर्चा निष्फळ झाल्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी मुधोळ विभागात बंदचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकरी नेते विरण्णा हंचिनाळ यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विरोध मावळला आहे. आमचे आंदोलन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यांनी आमच्या समस्या सोडविण्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवडाभरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यास सहमती दर्शविली आहे. जर राज्य सरकार आपल्या आश्वासनापासून दूर गेले, तर शेतकरी पुन्हा आंदोलन करतील. आणि हे आंदोलन फक्त बागलकोट नव्हे तर पूर्ण कर्नाटकमध्ये असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here