राहुरी येथील बंद पडलेला साखर कारखाना सुरु करण्याचा निर्णय पडला विखेंच्या पथ्यावर

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

राहुरी कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात आमदार शिवाजी कर्डिले यांनी डॉ. सुजय विखे यांना भाजपमध्ये या असे जाहीर आवाहन केले होते व ते डॉ. सुजय विखे मान्य केले आणि भाजपची अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. त्यानंतर बंद पडलेला राहुरी येथील डॉ. बा़बा़ तनपुरे सहकारी साखर कारखाना डॉ. सुजय विखे यांनी सुरू केल्याचा त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगलाच फायदा झाला.

तनपुरे कारखान्याचे सलग दोन गळीत हंगाम यशस्वी केल्याने डॉ. सुजय विखे यांना राहुरी मतदार संघातून या निवडणुकीत आघाडी घेण्याचा मार्ग सुखकर झाला, त्यांच्यावर सदर भागातील ऊस शेतकरी खुष होता त्यामुळे विजयाच्या मार्गात राहुरी मतदारसंघ विखेंचा बालेकिल्ला ठरल्याचे उघड झाले, तनपुरे कारखान्यावर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर विखे यांची राहुरीच्या पटलावर पकड अधिक मजबूत झाल्याचे या निवडणुकीतून समोर आले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना राहुरी मतदारसंघातजास्त प्रचार करता आला नाही तसेच ते सामान्य जाणते पर्यंत पोहचू शकले नाहीत याउलट डॉ. सुजय विखे याउलट गेल्या अडीच वर्षापासून गावोगावी जाऊन खासदारकीची तयारी सुरू केली होती, आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघ पिंजून काढला़ पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही, आमदार शिवाजी कर्डिले यांचे आमदार जगताप हे जावई आहेत पण त्यांना अपेक्षित मदत झाली नाही, कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांकडून जगताप यांना पाठिंबा मिळाला नाही़ त्यामुळे मताधिक्य वाढले नाही.

राहुरीत भाजपची ताकद वाढली

डॉ. सुजय विखे यांच्या विजयाने साहजिकच राहुरी मतदार संघात भाजपची ताकद वाढली आहे, लोकसभा निवडणुकीचा फायदा विधानसभेला होऊ शकतो़ त्याचबरोबर कर्डिले-विखे यांची जवळीक अधिक घट्ट होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here