लॉकडाउन: तामीळनाडूमध्ये साखर कारखाना आणि ऊस शेतकर्‍यांची चिंता वाढली

चेन्नई : तामिळनाडू तील राजपलायम आणि श्रीविल्लीपुथुर च्या ऊस शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. कोरोंना संकटामुळे मजूर न मिळाल्याने, ऊसतोडणीमध्ये उशिर होत आहे. 5 हजार एकरात हा ऊस आहे. आणि तो आता वाळत चालला आहे. ऊसाची शेती गेल्या वर्षी मार्च पासून मे महिन्याच्या दरम्यान करण्यात आली होती. आता 12 महिन्याच्या आत ऊस तोडणी करावी लागणार होती. पण कोरोना वायरसचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे ऊसतोडणीत उशिर होत आहे.

तमिझागा विवासायगल संगम चे अध्यक्ष एन.ए. रामचंद्र राजा यांनी सांगितले की, या शेतांमध्ये प्रत्येक शेतकर्‍याने प्रति एकर कमीत कमी 50 हजार रुपयाची गुंतवणूक केली आहे. धारनी शुगर्स चे अधिकारी यांनी सांगितले की, ऊस तोडणीसाठी 80 टक्के मजुरांना विल्लुपुरम आणि कुड्डालोर सारख्या दुसर्‍या जिल्ह्यांमधून आणावे लागते . श्रीविल्लीपुथुर, वाट्रप, सीथुर आणि राजापलायम मध्ये पूर्ण परिसरामध्ये ऊस तोडणीसाठी मोठ्या संख्येमध्ये कष्टकर्‍यांना आणण्यासाठी आम्हाला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे. स्थानिक स्तरावर केवळ 20 टक्के मजूर आहेत. यामुळे संपूर्ण ऊसाची तोडणी शक्य नाही.

कृषी विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, विल्लुपुरम, कुड्डलोर आणि विरुधुनगर हे तीन जिल्हे कोरोना संक्रमित आहेत. आणि हे रेड झोनमध्ये आहेत. यामुळे अडचणी येत आहेत. त्यांनी सांगितले की, या रेड झोन मधल्या परिसरातून 500 मजूरांना आणणे जोखमीचे होईल.

कारखान्याच्या अधिकार्‍याने सांगितले की, ऊसाच्या कमीमुळे साखर कारखाने जवळपास 20 टक्के क्षमतेसह सुरु आहेत. ऊस असोसिएशन चे अध्यक्ष रामचंद्र राजा यांनी राज्य सरकारकडून या दिशेमध्ये लवकरात लवकर एक अनुकुल निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here