मुख्यमंत्र्यांची आज ऊस शेतकर्‍यांबरोबर महत्वपूर्ण बैठक

77

पणजी : राज्य सरकारकडून संचालित संजीवनी साखर कारखान्यांबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज तक्रारींचे समाधान करण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यां बरोबर बैठक आयोजित करणार आहेत. राज्यातील ऊस शेतकर्‍यांच्या समुहाने उत्तर गोव्याच्या उसगाव मध्ये संजीवनी कारखान्याच्या समोर बुधवारी अनिश्‍चितकालीन उपोषण सुरु केले होते, तेव्हा त्यांना मुख्यमंत्र्यांनी बैठक़ीचे आश्‍वासन दिले होते.

राज्याचे सहकारमंत्री गोविंद गौड यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते की, सरकार ऊस शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत संवेदनशील आहे. गोवा ऊस शेतकरी संघाचे उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई यांनी सांगितले की, गेल्या वर्षाच्या 32,000 मेट्रीक टनाच्या तुलनेत यावर्षी जवळपास 40,000 मेट्रीक टन ऊसतोडणी केली जाईल. गोव्याचे ऊस शेतकरी आज होणार्‍या बैठकीकडे डोळे लावून बसले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here