ऊस थकबाकीसाठी रालोद ने केल्या मुख्यमंत्री परत जा च्या घोषणा

सहारनपूर : राष्ट्रीय लोकदर कार्यकर्त्यांनी सर्किट हाउस पोचून मुख्यमंत्री परत जा, ऊस थकबाकी घेवून या तसेच शेतकरी विरोधी सरकार च्या घोषणा दिल्या. मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याच्या भूमिकेवर रालोद कार्यकर्ते ठाम होते. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखून धरले. सिटी मेजिस्ट्रेट यांनी समजवल्यानंतर कार्यक़र्त्यानी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारे निवेदन त्यांच्याकडे सुपुर्द केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सहारनपूर आगमनावर शनिवारी रालोद कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष राव केसर सलीम आणि प्रदेश महासचिव चौधऱी धीर सिंह यांच्या नेतृत्वामध्ये हातामध्ये मुख्यमंत्री परत जा, ऊस थकबाकी घेवून या…. या मागणीसाठी कार्यकर्ते सर्किट हाउस वर पोचले. मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या भूमिकेवर ठाम असणारे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. त्यांचे म्हणणे होते की, सहारनपूर मंडल च्या साखर कारखान्यांवर शेतकर्‍याचें 2400 करोड रुपये तसेच सहारनपूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर 654 करोड रुपये देय आहेत. आंदोलनकर्त्यांमध्ये सागर चौधरी, राव इरफान, राव अल्तमश, राव अरिफ, उदित चौधरी, असिफ पार्षद, मयंक चौधरी, हाफिज समीर, संजय कंबोज, प्रवेश कश्यप आदी उपस्थित होते.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here