छत्तीसगड : ऊस शेतीकडे शेतकर्‍यांनी फिरवली

145

पाठकबीरधाम : ऊस थकबाकीमुळे वैतागलेल्या शेतकर्‍यांनी आता ऊस शेतीकडे चक्क पाठ फिरवली आहे. छत्तीसगड येथील कबीरधाम जिल्ह्यात दोन साखर कारखाने असूनही यावेळी ऊस शेतीचे क्षेत्रफळ 5 हजार हेक्टर पर्यंत कमी झाले आहे. 2018-19 मध्ये येथे 27,458 हेक्टर क्षेत्रफळामध्ये ऊस लागवड करण्यात आली होती, 2019-20 मध्ये केवळ 22,580 हेक्टर क्षेत्रात ऊस लावला आहे. इतर अनेक राज्यांप्रमाणे छत्तीसगड मध्येही ऊस थकबाकीची समस्या आहे, शेतकर्‍यांची देणी वेळोवेळी भागवली जात नाहीत, यामुळे शेतकरी ऊस शेतीऐवजी इतर पीकाकडे वळत आहेत.

कारखान्यांद्वारा उत्पादित केलेल्या साखर विक्रीसाठी केंद्र सरकारने कोटा सिस्टीम निश्‍चित केली आहे. यानुसार, एका महिन्यात कबीरधाम जिल्हयातील दोन्ही कारखाने 24,480 क्विंटल पेक्षाही अधिक प्रमाणात साखर विकू शकत नाहीत. यामुळे कारखान्यांना खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे भागवण्यात अडचणी येत आहेत. ज्याची शिक्षा शेतकर्‍यांना भोगावी लागत आहे, यामुळेच शेतकर्‍यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरवली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here