ओडिशामध्ये गाळप हंगामाला ‘मुहूर्त’; शेतकरी, कामगारांचे आंदोलन मागे

बेहरामपूर (ओडिशा) : चीनी मंडी

सर्वसाधारणपणे डिसेंबरमध्ये सुरू होणारा ओडिशातील ऊस गाळप हंगाम यंदा एक महिना उशिराने सुरू होत आहे. ऊस उत्पादकांचे आंदोलन आणि कारखान्यातील कामगारांचे काम बंद आंदोलन यांमुळे हंगाम सुरू होण्यास उशीर झाला आहे. जिल्हा प्रशासनाने यात हस्तक्षेप केल्यानंतर आता गाळप हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २३ तारखेपासून ऊस गाळप सुरू होणार आहे.

बेहरामपूर येथील अस्का को-ऑपरेटिव्ह साखर कारखान्याच्या कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. तातडीने पगार द्यावेत, मागील थकबाकी द्यावी आणि इन्सेटिव्ह द्यावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. तत्पूर्वी, ऊस उत्पादकांनी उसाला प्रति टन ३५०० रुपये दर मिळावा, यासाठी आंदोलन सुरू केले होते. याबाबत निर्णय झाल्याशिवाय ऊस तोड न करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला होता. या दोन आंदोलनांमुळे साखर उद्योगात अस्वस्थता होती.

दरम्यान, गंजम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय अम्रिता कुलंगे यांनी या विषयात हस्तक्षेप केला आणि प्रति टन २९५० रुपये दर जाहीर करण्यात  आला. त्याला ऊस उत्पादकांनीही मान्यता दिली.

त्यानंतर अस्का को-ऑपरेटिव्ह साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्या कामगारांची बैठक घेतली. त्यावेळी पंधरा दिवसांत कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली. त्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे.

डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here