फिजी च्या ऊस शेतकर्‍यांना गाळप हंगामापूर्वी मिळेल अर्थिक सहकार्य

सुवा: गाळप सुरु होण्यापूर्वीच ऊस शेतकर्‍यांना अधिक चांगल्या पद्धतीने आर्थिक सहकार्य करण्याला फिजी साखर मंत्रालयाने प्राधान्य दिले आहे. स्थायी सचिव योगेश करण यांनी सांगितले की, जूनमध्ये सुरु होणार्‍या नव्या गाळप हंगामा बरोबर त्यांनी या आठवड्यात चालू होणार्‍या चौथ्या ऊस बिल भागवण्यास मंजूरी दिली आहे. साखर उद्योग न्यायाधिकरणाच्या अनुसार 95 मिलियन डॉलरपेक्षा अधिक बिले भागवली जातील.

करण यांनी सांगितले की, मुख्यत्वे ही बिले शुक्रवारपर्यंत भागवली जावीत. जेणेकरुन शेतकर्‍यांना तोडणीच्या हंगामासाठी तयार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. शेतकर्‍यांना तोडणीपूर्वी ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर उपकरणांची दुरुस्ती करुन घ्यावी लागते. करण यांनी सांगितले की, या फंडिंगच्या पाठबळामुळे ऊस शेतकर्‍यांना 10 जूनला लबसा कारखाना उघडण्यासाठी चांगली तयारी करण्यामध्ये मदत मिळेल. यानंतर 23 तारखेला ररवाई कारखाना आणि 24 ला लुटोका कारखाना सुरु होईल. पुढच्या महिन्यापासून ऊस गाळप हंगाम सुरु होत आहे, पण अनेक शेतकर्‍यांनी श्रमिक कमी असल्याची काळजी व्यक्त केली होती. करण यांनी आश्‍वासन दिले की, या समस्येचे निराकरण केले जाईल. श्रमिकांची कमी पाहता आम्ही भारतातून यांत्रिक हार्वेस्टर साठी ऑपरेटर आणणार आहोत. ऊस तोडणीच्या हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या विलंबापासून वाचण्यासाठी स्थानिक हार्वेस्टर चे प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच सुरु होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here