हरियाणा : नारायणगड कारखान्याच्या सीईओची बदली न करण्याची शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अंबाला : नारायणगड साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम करणाऱ्या नारायणगड उपविभागीय दंडाधिकारी (SDM) C Jayasharadha यांच्या बदलीच्या वृत्ताने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. ”द टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नारायणगडच्या उपजिल्हाधिकारी C Jayasharadha यांची प्रमोशनसह बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. कारखान्याचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडणाऱ्या कार्यक्षम अधिकारी C Jayasharadha यांची बदली करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जवळपास एक वर्षापूर्वी त्यांना अंबालातील नारायणगढ साखर कारखान्याचे सीईओपद देण्यात आले होते.

भारतीय किसान युनियनच्या (बिकेयू) चारुनी विभाग अध्यक्ष राजीव शर्मा, ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष विनोद राणा, बिकेयूचे राज्य उपाध्यक्ष शहीद भगत सिंह विक्रम राणा, संयुक्त किसान समितीचे अध्यक्ष शिंगारा सिंह, धनराज, चमनलाल आणि बिकेयू टिकैत गटाचे बलदेव सिंह यांच्यासह विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले की, C Jayasharadha यांनी शेतकरी हिताबरोबरच कारखान्याला उर्जितावस्था आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तीन वर्षापूर्वी नारायणगड साखर कारखान्याला ऊस टंचाईची समस्या भेडसावत होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांची ऊस बिलेही वेळेवर दिला जात नव्हती. कारखान्याला घरघर लागली होती. त्यामुळे सरकारने कारखान्याचे व्यवस्थापन आपल्या हाती घेतले आणि नारायणगडच्या उपजिल्हाधिकारी C Jayasharadha यांना सीईओपदी नियुक्त केले. C Jayasharadha यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात कारखान्याची देणी ६७ कोटी रुपयांवरून घटून ४२ कोटींवर आली आहेत, याकडे शेतकऱ्यांच्या संघटनांनी लक्ष वेधले आहे. एक वर्षाच्या कार्यकाळात साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांकडून कोणतेही मोठे आंदोलन झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here