सोशल मीडियाशी जोडले जाणार ऊस उत्पादक शेतकरी

आझमगड: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाच्या प्रगत जाती आणि इतर अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मशी जोडले जाईल. विभागातील शेतकर्‍यांना विविध स्तरांवर फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. अतिरिक्त मुख्य सचिव भुसरेड्डी यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोशल मीडियाशी जोडले जावे असे आदेश राज्यातील सर्व जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना पाठविलेल्या परिपत्रकात दिले आहेत. आदेश प्राप्त झाल्यानंतर ऊस विकास विभागाने शेतकऱ्यांना सोशल मीडियाशी जोडण्याची मोहीम सुरू केली आहे.जिल्ह्यात १७६६४ ऊस पुरवठादार शेतकरी आहेत. हे सर्व शेतकरी एम किसान पोर्टलवर आधीच जोडले गेलेले आहेत.

जिल्हा ऊस अधिकारी अशर्फी लाल यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड फोन आहेत, त्यांना फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबशी जोडून राज्य सरकार आणि ऊस विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली जाईल. त्यांनी सर्व सहकारी ऊस सोसायटी सचिव आणि वरिष्ठ ऊस विकास निरीक्षकांना सोसायटी कर्मचारी आणि ऊस पर्यवेक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ऊस पर्यवेक्षक, सहकारी ऊस सोसायटीचे कर्मचारी आणि सहकारी साखर कारखान्यांचे क्षेत्रीय कर्मचार्‍यानी आपापल्या विभागातल्या शेतकऱ्यांना सोशल मीडियाशी जोडले पाहिजे, असे सांगितले. यासाठी जिल्हा ऊस अधिकारी, ऊस विकास परिषद व ऊस विकास समितीनिहाय फेसबुक व ट्विटर अकाउंट तयार करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here