ऊस शेतकर्‍यांना लवकरच मिळणार ऊसाचे पैसे

152

ऋषिकेश: डोईवाला साखर कारखान्याने गेल्या गाळप हंगामाचे जवळपास 21.15 करोड थकबाकीचे पैसे ऊस समितीला दिले आहेत. भागातील ऊस शेतकर्‍याचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा होतील. शनिवारी डोईवाला साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनमोहन सिंह रावत यांनी सांगितले की, गेल्या गाळप हंगामाचे पूर्ण पैसे 21,14,25,722 रुपये दिले आहेत. हे पैसे लवकरच ऊस शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होतील. तर दूसरीकडे ऊससमितीचे सचिव गजेंद्र सिंह रावत यांनी सांगितले की, थकबाकी साखर कारखान्याकडून मिळाली आहे. कारखाना गेटवर ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांचा पूर्ण डाटा कम्प्युटर मध्ये फिड करण्यात आला आहे. तर खरेदी केंद्रांवर डाटा अपडेट केला जात आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा हा डाटा अपलोड होईल, त्यानंतर ऊसाचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here