उत्तर प्रदेशात ऊस शेती झाली स्मार्ट, ४० लाख शेतकऱ्यांकडे ई शुगरकेन अ‍ॅप

उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृ्त्वाखालील सरकारच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. तर ऊसाची उत्पादकताही वाढली आहे. २०२०-२१ या हंगामात ऊस शेतकरी संस्थेने ६६,९६३ शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान दिले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राज्यात उच्चांकी ८१.५ टन ऊस उत्पादन झाले आहे.

गेल्या चार वर्षात राज्य सरकारने शेतीमध्ये बदल केले आहेत. परिणामी शेतकरी समृद्ध झाले आहेत. राज्यात ४० लाख शेतकऱ्यांनी ई गन्ना अ‍ॅप (ई शुगरकेन अ‍ॅप) डाउनलोड केले आहे. हे अ‍ॅप उत्तर प्रदेश कृषी विभागाशी जोडले गेले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला आहे. यातून शेतकरी दलालांपासून मुक्त झाले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना आवश्यक ती माहितीही मिळत आहे.

उत्तर प्रदेशच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांमुळे आतापर्यंत या अॅपवर ८१ कोटी हीट मिळाले आहेत. तर स्मार्ट ऊस शेतकरी वेबसाईटवर ५.१ कोटी हीट मिळाले आहेत. ऊस विभागाने शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. याशिवाय मध्यस्त संपविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here