उपायुक्तांच्या बैठकीच्या आश्वासनाने ऊस उत्पादकांचे आंदोलन स्थगित

म्हैसूर : उपायुक्त बगदी गौतम यांनी आपले प्रतिनिधी आणि साखर कारखान्याच्या मालकांची मंगळवारी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर म्हैसूरच्या उपायुक्त कार्यालयासमोर सुरू ठेवलेले बेमुदत आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्थगित केले. ऊस उत्पादकांनी उसाचा योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) वाढविण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. म्हैसूरचे संयुक्त कृषी संचालक महंतेशप्पा यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली होती. पुढील आठवड्यात यासंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले होते.

द हिंदू डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी गेल्या महिनाभरात तीनवेळा उपायुक्त कार्यालयाला निवेदने दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत आणि जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याचे सांगत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर महंतेशप्पा हे आंदोलन स्थळापासून निघून गेले होते. मात्र, ते काही वेळानंतर परतल्यावर शेतकरी नेता कुरबुर शांताकुमार यांनी महंतेशप्पा यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली. १७ ऑगस्ट रोजी साखर कारखानदार आणि शेतकरी प्रतिनिधींची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. साखर कारखानदारांकडून उसाचो तोडणी आणि वाहतुकीचे पैसे गेल्या १३ महिन्यांपासून मिळाले नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत, असे शांताकुमार यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here