आठ तास विज पुरवठ्याची ऊस उत्पादकांची मागणी

गुरदासपूर: काहनूवान परिसरातील शेतकरी विजेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. काहनूवान परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. मात्र, सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामात शेतकऱ्यांना ऊस तसेच अन्य पिकांच्या सिंचनासाठी आवश्यक विजेचा पुरवठा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऊसाच्या सिंचनासाठी काहनूवान परिसरातील शेतकऱ्यांनी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली पंजाब पॉवर कॉमच्या जिल्हा अधिकाऱ्यांना विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

शेतकरी नेते सतनाम सिंह, जसबीर सिंह गोराया, बलविदर सिंह आदींनी सांगितले की, गव्हाची कापणी झाली की लगेच शेतकरी उसाची लागण करण्यास सुरुवात करतात. मात्र, या कालावधीत शेतकऱ्यांना आठ तास विज उपलब्ध होत नाही. त्यामुळे उसाची लागण करण्याच्या कामात अडथळे उत्पन्न होतात. ऊस उत्पादक क्षेत्रात किमान आठ तास विज पुरवठा केला जावा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here