लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देताना राज्य सरकार १० रुपये प्रती क्विंटल बोनस देऊ शकते असे स्थानिक प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. या वाढीचा फायदा राज्यातील ४५ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
सरकारने दिलेल्या २५ रुपये एसएपीमुळे फारसा फायदा झालेला नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कार्यकाळात गेल्या चार हंगामात ही एकमेव वाढ करण्यात आली आहे. पीलीभीत येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनीही अलिकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने ४०० रुपये प्रती क्विंटल दराने एसएपी करावा अशी मागणी केली होती.
राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते.