ऊस शेतकरी ऐन निवडणुकीत देऊ शकतात भाजपला झटका

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

शामली (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

शामली येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकी प्रकरणी आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताच्या एकाही घोषणा समावेश नसल्यामुळे अखिल भारतीय किसान युनियनने येत्या १४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. तसेच उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री सुरेश राणा यांच्या कार्यालयालाही घेराव घालण्याची घोषणा किसान युनियनने केली आहे. ऊस बिलाची थकबाकी मिळाली तरच लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करू, अन्यथा भाजपला विरोधाला सामोरे जावे लागेल, असा इशारा किसान युनियनने दिला आहे.

उत्तर प्रदेशमधील ऊस बिल थकबाकी प्रकरणी अखिल भारतीय किसान युनियन आक्रमक झाली आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी राज्यातील  प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळचे आंदोलन म्हणजे, आर-पारची लढाई असेल, असे किसान युनियनच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेश टिकैत यांनी आंदोलनाची रणनीती तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. ऊस मंत्री सुरेश राणा यांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येणार असून, जोपर्यंत मंत्री राणा धरणे आंदोलनात येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले. तसेच जर, आता एफआरपीची थकबाकी मिळाली नाही, तर लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरलाच विरोध का?

सध्या उत्तर प्रदेशमध्ये दहा वर्षांपूर्वीच्या ट्रॅक्टरना बंदी करण्यात आली आहे. त्यावरही किसान युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. जर, अधिकाऱ्यांच्या दहा वर्षांपूर्वीच्या गाड्या रस्त्यांवर धावत असतील, तर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरलाच विरोध का? असा प्रश्न युनियनने उपस्थित केला आहे. या प्रकरणी युनियन आंदोलन करणार असून, अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तपासणी करणार आहे. त्यात जुन्या गाड्या जप्त करण्यात येतील, असे युनियनने स्पष्ट केले आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChinimandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here