ब्राजीलबरोबरच्या करारामुळे 18 राज्यातील ऊस उत्पादकांचे होणार हाल : राजू शेट्टी

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सागितले की, जर ब्राजील आणि भारत सरकार दरम्यान साखर, इथेनॉल आणि बायो डिजेल च्या व्यापारासाठी करार झाला तर देशातील 18 राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील. शुक्रवारी अखिर भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समिती च्या केंद्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप झाला.

याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या पत्रकार बैठक़ीत ते बोलत होते. ते म्हणाले, ब्राजीलचे राष्ट्रपती बोलसोनारो प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारत दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या दौर्‍याला आमचा विरोध नाही. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्राजील सोबत साखर, इथेनॉल आणि बायो डिजेल उद्योग संदर्भात करार केला तर त्याला आमचा विरोध राहील. केंद्र सरकारला विरोधाचा सामना करावा लागेल. शेट्टी म्हणाले की, ब्राजीलने डब्ल्यूएचओ मध्ये भारतातील साखर, इथेनॉल आणि बायो डिजेल उद्योग धोरनाला विरोध केला आहे. यामुळे भरतात साखर निर्यात होवू शकत नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here